कणकवली उपजिल्हा रुग्णालयात होणार फळवाटप

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचंनिमित्त
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: July 23, 2025 16:26 PM
views 88  views

कणकवली : उबाठा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उबाठा शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने रविवार २७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता कणकवली येथील स्वयंभू मंदिर येथे उद्धव ठाकरेंना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी  अभिषेक करण्यात येणार आहे. तर सकाळी १०.३० वाजता कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळेवाटप करण्यात येणार आहेत.

यावेळी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतिश सावंत, महिला जिल्हाप्रमुख निलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील शिवसेना, महिला, युवासेना, शिवसेना संलग्न संघटनेच्या सर्व आजी माजी पदाधिकारी,स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी माजी लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख कन्हैय्या पारकर आणि तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत यांनी केले आहे.