
सावंतवाडी : सावंतवाडी येथील अंकूर महिला निवारा केंद्रातील महिलांना आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शहर महिला आघाडी तर्फे फळवाटप तसेच छोट्या मुलींना नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत कविटकर, नगरसेविका शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक व शिवसेनेच्या जेष्ठ कार्यकर्त्या सुप्रिता धारणकर, शिवानी पाटकर, भारती नाईक, अनघा सावंत, पूजा नाईक, रंजना आंबेरकर, नम्रता वाडकर, गुप्ता, पडवेकर, कांचन जाधव, संध्या पाटणकर, साधना मोरे आदी महिला उपस्थित होत्या.











