युवासेनेकडून रुग्णांना फळवाटप | औचित्य आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाचं

Edited by: संदीप देसाई
Published on: June 15, 2023 21:46 PM
views 81  views

दोडामार्ग : आदित्य ठाकरे यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून दोडामार्ग तालुका युवा सेनेच्या वतीने गुरवारी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथे युवा सेनेचे तालुकाप्रमुख मदन राणे यांच्या संकल्पनेतून फळवाटप व वझरे येथील मुलांना वह्या वाटप करण्यात आले.

 ठाकरे शिवसेनेची युवा सेना अलीकडे कमालीची ॲक्टिव्ह झाली असून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत आहे. यावेळी डॉ. रामदास रेडकर यांसह शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, शिवसेना तालुकाप्रमुख संजय गवस, उप तालुका प्रमुख मिलिंद नाईक,  विजय जाधव, मणेरी उपविभाग प्रमुख शिवराम मोरलेकर, सोनू खरवत, उप तालुका संघटक संदेश वरक, यावेळी तालुका संघटक संदेश राणे, उपतालुकाप्रमुख संदेश गवस, युवा सेना विभाग प्रमुख मणेरी शुभम देसाई, युवा सेना शहर प्रमुख ओंकार कुलकर्णी, युवा सेना माटणे उपविभाग प्रमुख समीर मावसकर,   प्रदीप सावंत, अश्विन जाधव, श्याम खडपकर उपस्थित होते.