सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून देवगड बंदरात हजारो मच्छीमार नौका दाखल...!

Edited by:
Published on: September 30, 2023 11:08 AM
views 120  views

देवगड : वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्यामुळे सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून देवगड बंदरात हजारो मच्छीमार नौका दाखल झाल्या आहेत. यामध्ये तामिळनाडू केरळ कर्नाटक राज्यातील नौकांचा समावेश आहे. 29 सप्टेंबर ते एक ऑक्टोंबर पर्यंत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तसेच ढगाळ वातावरण असल्यामुळे देवगड बंदरामधील कर्नाटक केरळ तामिळनाडू व स्थानिक नौका सुरक्षिततेसाठी दाखल झाले आहेत. देवगड बंदर हे लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे बंदर असून अनेक वेळा मोठमोठी वादळ झाली. त्यावेळी देवगड बंदरामध्येच अनेक राज्यातील नौकांनी आश्रय घेतला होता. हवामान खात्याचा आदेश आल्यानंतर प्रत्येक वेळी देवगड बंदरामध्ये सुरक्षितेसाठी आजही नौका दाखल होत आहेत.