
देवगड : देवगड साळशी येथील BSNL मोबाईल सेवा वारंवार खंडीत होत असल्यामुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे. BSNL शिवाय या गावामध्ये संपर्कासाठी दुसरा पर्याय नसल्याने गावा पासून ६ किमी अंतरावर अत्यवश्यक परिस्थितीत रात्री अपरात्री दूरध्वनी वरून संपर्क करण्यासाठी शिरगावला जावे लागत आहे. तसेच बाहेर गावी शहराकडे नोकरी व्यवसाय शिक्षणासाठी असलेल्या कुटुंबियांना आपल्या गावातल्या घराकडे नातेवाईक आणि वृद्धांना संपर्क होत नाही. ग्रामस्थांनी याबाबत देवगड बिएस्एनएल कार्यालयाला भेट देऊन निवेदन दिले आहे.