
दोडामार्ग : फ्रिक्वेन्सी प्रीस्कूल आणि अॅक्टिव्हिटी सेंटर, दोडामार्ग येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.
डॉ. योगना मोरजकर (वैद्यकीय क्षेत्र), सौ. स्नेहा देसाई (वकील), सौ. सोनिया साजन परब (लेखिका), सौ. रन्तमाला विश्वनाथ रेडकर (समाजसेविका), सौ. सुनीता गावस (पोलीस अधिकारी), सौ. नर्मदा केशव पटेल (उद्योजिका) यांचा सन्मान करण्यात आला. मान्यवरांनी आपल्या जीवनप्रवासातील प्रेरणादायी अनुभव उपस्थितांसमोर मांडले. विशेषतः डॉ. योगना मोरजकर यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना आरोग्यविषयक महत्वाची माहिती दिली. लहान मुलांचे पोषण, स्वच्छता आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी यावर त्यांनी मार्गदर्शन केले. फ्रिक्वेन्सी प्रीस्कूलच्या संस्थापिका सौ. कीर्ती खोबरेकर यांनी सर्वांचे आभार मानले व महिलांच्या सशक्तीकरणाचे महत्त्व स्पष्ट केले आणि महिलांच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल नाईक यांनी केले. शिक्षक रक्षिता, शीतल आणि दीप्ती यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले.