
कणकवली : सिंधुदूर्ग एज्यूकेशन सोसायटी संचलित श्री सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व बीएससी ॲग्रीकल्चर महाविद्यालय तोंडवली-नांदगाव येथील महाविद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या महाविद्यालयात व्यावसायिक शिक्षणासाठी मुलींना निःशुल्क प्रवेश दिला जाणार आहे.
तोंडवली येथे प्रशस्त जागेत श्री सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व बीएससी ॲग्रीकल्चर महाविद्यालय वसलेलं आहे. या शिक्षण संकुलामध्ये डि फार्मसी, बी फार्मसी, बी एससी ॲग्रीकल्चर हा व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध आहे. हे महाविद्यालय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण आहे. या महाविद्यालयात आधुनिक वर्ग व प्रयोगशाळा, मुलींकरिता स्वतंत्र वसतिगृह व कॅन्टीन सुविधा, दर्जेदार शिक्षण कॅम्पस प्लेसमेंट, सर्व विद्यार्थ्यांसाठी कॉलेज बस,अद्ययावत लायब्ररी व कॉम्प्युटर प्रयोगशाळा आदी
सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. यावर्षी शासन निर्णयानुसार खुल्या व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील पात्र विद्यार्थीनींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कमध्ये १००% सवलत देण्यात येणार आहे. बी. फार्मसी, डी. फार्मसी व बी. एस. सी. ऍग्रीकल्चर या अभ्यासक्रमाकरिता सदर योजनेचा लाभ देण्यात येत आहे. व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचा अधिकाधिक सहभाग होण्यासाठी सिंधुदूर्ग एज्यूकेशन सोसायटी कायमच प्रयत्नशील राहते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व विद्यार्थीनींनी आजच फार्मसी व कृषी महाविद्यालयाला भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करावा. अधिक माहितीसाठी ७७५६९७३८४३ व ८९७५६१०१३८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.