
सावंतवाडी : सामाजिक बांधिलकी, सावंतवाडी या संघटनेने शासकीय योजनेतून डोळ्यांचे मोफत ऑपरेशन हा उपक्रम हाती घेतला आहे. ज्यांना कोणाला मोतीबिंदू ऑपरेशन व डोळ्यांच्या विकाराबाबत काही समस्या असल्यास अशा व्यक्तींनी सामाजिक बांधिलकीशी संपर्क साधावा. त्या व्यक्तीला चेकअप पासून ऑपरेशन होईपर्यंत सामाजिक बांधिलकी टीमच्या माध्यमातून पूर्णपणे सहकार्य करण्यात येणार आहे.
पेशंट सोबत त्याचा एक नातेवाईक असणं गरजेचं आहे. त्या अगोदर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये डोळे तपासणी मंगळवार व शुक्रवार सकाळी 10 ते 3 पर्यंत ठेवण्यात आलेला आहे. गेल्या महिन्यात 224 डोळ्यांची ऑपरेशन विनामूल्य जिल्हा रुग्णालय, ओरोस मध्ये करण्यात आलेली होती, अशी माहिती नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ. शुभजित धुरी यांनी दिली.
आज सावंतवाडी शहरातील दोन वयोवृद्ध व्यक्तींना सामाजिक बांधिलकीकडून पूर्ण सहकार्य करून त्यांना शासनाच्या या योजनेचा लाभ मिळवून दिला.
शहरात व आजूबाजूच्या गावांमध्ये मोतिबिंदूचे पेशंट असतील तर त्यांनी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर 9422435760, रवी जाधव 9405264027, संजय पेडणेकर 9422379502, समीर वंजारी 9822454023 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.