शिक्षक समितीच्या मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षेत वजराट नं. १ ची स्वरधा झेंडे प्रथम

Edited by:
Published on: January 24, 2025 16:27 PM
views 350  views

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हास्तरीय पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन  करण्यात आले होते. या सराव परीक्षेत कु.स्वरधा अरविंद झेंडे,शाळा वजराट नं.१, ता. वेंगुर्ला हिने प्रथम,कु.अर्णव राजाराम भिसे, शाळा हरकुळ खुर्द गावडेवाडी, ता.कणकवली याने द्वितीय तर कु.नीरज शेखर परब,शाळा वजराट नं.१ याने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. 

शिक्षक समिती सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील पूर्व माध्यमिक (इयत्ता ५ वी) शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ विदयार्थ्यांना मोफत सराव परीक्षेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.यावर्षी ही परीक्षा  जिल्ह्यातील १४४ केंद्रांवर संपन्न झाली होती.या परीक्षेचा निकाल परीक्षा संपन्न झाल्यावर लगेचच जाहीर करण्यात आला होता.

या परीक्षेतील टॉप टेन यादीतील विदयार्थी खालील प्रमाणे आहेत. प्रथम क्रमांक-कु.स्वरधा अरविंद झेंडे,शाळा वजराट नं.१,ता.वेंगुर्ले (२६२ गुण),द्वितीय क्रमांक-कु.अर्णव राजाराम भिसे, शाळा हरकुळ खुर्द गावडेवाडी,ता.कणकवली (२६० गुण),तृतीय क्रमांक-कु.नीरज शेखर परब,शाळा वजराट नं.१,ता.वेंगुर्ले (२४२ गुण),चतुर्थ क्रमांक-कु.भावेश संभाजी तौर, शाळा एम.आय.डी.सी.कुंभारवाडा,ता.कुडाळ (२३८ गुण),पाचवा क्रमांक-कु.प्रथमेश सीताराम लांबर,शाळा आडेली नं.१,ता.वेंगुर्ले (२३८ गुण),सहावा क्रमांक-कु.यशवंत शाबी तुळसकर,शाळा घोटगेवाडी, ता.दोडामार्ग (२३८ गुण),सातवा क्रमांक-कु.वीरा राजीव घाडी, शाळा सावंतवाडी नं.४,ता.सावंतवाडी (२३६ गुण),आठवा क्रमांक-कु.श्रेयस लक्ष्मण नरळे, शाळा रानबांबुळी नं.१,ता.कुडाळ (२३४ गुण),नववा क्रमांक-कु.पियुषा उत्तरेश्वर नेहरकर,शाळा ओटवणे नं.२,ता.सावंतवाडी (२३० गुण),दहावा क्रमांक-कु.तनिष्का हेमंत नार्वेकर,शाळा आंबोली नांगरतास,ता.सावंतवाडी (२३० गुण).

वरील सर्व टॉप टेन विद्यार्थ्यांचा गौरव शिक्षक समितीच्या वतीने जाहीर कार्यक्रमात करण्यात येणार आहे. तर तालुकास्तरावरही यशस्वी विदयार्थ्यांचा गौरव तालुका शाखांमार्फत करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस व सरचिटणीस तुषार आरोसकर यांनी दिली आहे.