देवगडात 27 ऑक्टोबरला मोफत वैद्यकीय शिबिर

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 26, 2023 19:53 PM
views 109  views

देवगड : एस एस पी एम एस हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज पडवे आणि श्री देवगड तालुका पाटिदार युवा मंडळ आणि लाईफ लाईन फाउंडेशन देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ ते बारा या वेळात डॉ आठवले कॅम्पस येथे एक वैद्यकीय शिबिर संपन्न होणार आहे.

या शिबिरात एस एस पी एम एस पडवे हॉस्पिटल येथे ज्या रुग्णांची अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी, बायपास झाली आहे , तसेच हृदय रोगाचे व डायबिटीसचे रुग्ण या सर्वांची मोफत तपासणी होणार आहे. आवश्यक त्या रुग्णांचा कार्डिओग्राम व ब्लड शुगर करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी एस एस पी एम एस हॉस्पिटल तर्फे डॉ स्नेहल जाधव एमडी मेडिसिन या फिजिशियन आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

पाठ दुखी कंबर दुखी सांधे दुखणे मान दुखणे पूर्वीचे फ्रॅक्चर झालेले रुग्ण इत्यादी हाडांच्या रुग्णांची तपासणी अस्थिरोग तज्ञ डॉ तन्मय आठवले मोफत करणार आहेत . आवश्यक त्या रुग्णांची हाडांची ठिसूळता मोजण्याची बोन मिनरल डेन्सिटी या मशीन द्वारा मोफत तपासणी करण्यात येणार आहे. नॅब आय हॉस्पिटल तर्फे डोळयाची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. आवश्यक त्या रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करण्यात येणार आहे.

या सर्व तपासण्या मोफत करण्यात येणार असल्यामुळे अधिकाधिक रुग्णांनी या शिबिराचा फायदा घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क भावेश पटेल 9422884363 प्रफुल्ल पटेल 9421189277