सोनुर्लीत मोफत आरोग्य तपासणी शिबीर..!

Edited by: विनायक गावस
Published on: March 14, 2024 10:32 AM
views 127  views

सावंतवाडी : गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, सोनुर्ली ग्रामपंचायत, माऊली दशावतार नाट्य मंडळ आणि आई माऊली कलामंच यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी १७ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सोनुर्ली प्राथमिक शाळेत मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात हृदयरोग, उच्च रक्तदाब, ऍलर्जी व दमा श्वसन विकार, त्वचाविकार, लिव्हर व किडनी विकार, हाडाचे व सांध्याचे आजार, पक्षाघात, वातविकार, मधुमेह, मुळव्याध, घसा, थायरॉईड, बालरोग, पचन, स्त्रीरोग व अन्य जुनाट विकार असलेल्या रुग्णांची तपासणी करुन रुग्णांना मोफत आयुर्वेदिक औषधे देण्यात येणार आहे. सोनुर्ली परिसरातील गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, सोनुर्ली ग्रामपंचायत, माऊली दशावतार नाट्य मंडळ आणि आई माऊली कलामंच यांनी केले आहे.