जागतिक आरोग्य दिनानिमित्त वेंगुर्ला इथं मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान

अथायु हॉस्पिटलचे डॉक्टर्स करणार तासणी
Edited by: दीपेश परब
Published on: April 03, 2023 09:32 AM
views 178  views

वेंगुर्ले : जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून आधार फाऊंडेशन, सिंधुदुर्ग, वेंगुर्लेकर इंटिग्रेटेड रीसर्च व हेल्थ सेंटर, वेंगुर्ला (VIRHC), वेंगुर्ला गॅस सर्व्हिस, वेंगुर्ला यांच्यावतीने आयोजित व नगरपरिषद, वेंगुर्ला, वेंगुर्ला तालुका व्यापारी व व्यावसायिक संघ, बाजारपेठ मित्रमंडळ, वेंगुर्ला, वेंगुर्ला तालुका सहकारी मच्छिमार सोसायटी, पोलीस स्टेशन, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालय, पडवे SSPM लाईफटाईम हॉस्पिटल, शासकीय वैद्यकीय (MBBS) महाविद्यालय, सिंधुदुर्ग तसेच अथायु हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबीर शुक्रवार दि. ०७ एप्रिल २०२३ रोजी नगरपरिषद हॉल, वेंगुर्ला येथे सकाळी ९ ते २ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. 

   या शिबिरात मोफत तपासणी, औषध वाटप, आवश्यक रक्त चाचणी, ईसीजी, बीपी, शुगर, दिव्यांग तपासणी, क्षयरोग तपासणी आदी करण्यात येणार आहे. या शिबिरात अथायु हॉस्पिटल, कोल्हापूरचे कॅन्सरतज्ञ डॉ. बसवराज कडलगे, युरोलॉजी तज्ञ डॉ. राहूल पाटील, अस्थिरोग तज्ञ डॉ. जिनेश्वर कपाले, स्त्रीरोगतज्ञ डॉ. भुषण सुतार, जनरल मेडीसीन डॉ. विनायक रायकर, कान-नाक-घसा तज्ञ डॉ. रुपाली कपाले, जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्गचे कान-नाक-घसा तज्ञ डॉ. शाम राणे, स्त्रीरोगतज्ञ डॉ. डी. व्ही. करंबळेकर, शल्यचिकीत्सक डॉ. एस. एस. लिहीतकर, स्त्रीरोग व प्रसुती रोगतज्ञ डॉ. सुजय निगुडकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्गचे फिजिशियन डॉ. स्नेहल सावंत, डॉ. दिक्षा पवार, स्त्रीरोगतज्ञ डॉ. पुर्वा राऊत, दंतरोगतज्ञ डॉ. ऐश्वर्या जगताप, नेत्ररोगतज्ञ डॉ. संजय जोशी आदी डॉ उपस्थित राहून तपासणी करणार आहेत. 

 तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा व रुग्णांनी येताना आपल्यासोबत जुने रिपोर्ट किंवा फाईल घेऊ यावी, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.