ठाकरेसेना - युवासेना कलमठ यांच्या वतीने १० डिसेंबरला मोफत आरोग्य शिबिर

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 08, 2023 12:45 PM
views 103  views

कणकवली : श्री. विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट संचालित बी. के. एल. वालावलकर रुग्णालय डेरवण, चिपळूण  आणि उ.बा. ठा. शिवसेना - युवासेना कलमठ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. १० डिसेंबर सकाळी 9.30 ते 2.00 मोफत आरोग्य तपासणी जिल्हा परिषद शाळा कुंभारवाडी, कलमठ येथे आयोजित करण्यात आली आहे.

या आरोग्य शिबिरांत  हर्निया,चरबीच्या गाठी,नाक, कान, घसा, मोतीबिंदू शास्त्रकिया,अल्सर,थायरॉईड,फायब्रोडेनोमा, महिलांची गभर्भाशय तपासणी,टॉन्सिल्स,पित्ताशयातील खडे, स्तनाचा कॅन्सर,महिलांची गर्भाशय शास्त्रकिया,मुळव्याध, नाकाचा हाड वाढणे,अपेंडिक्स,प्रोस्टेट ग्रंथी, प्रोस्टेटप्रथी,कानाच्या पडद्याची तपासणी, मुतखडा, हायड्रॉसेल,इम्प्लांट रिमूव्हर,तोडाचा कॅन्सर, जनरल तपासण्या होणार आहेत.

या आरोग्य शिबिरांत विशेष तज्ञ डॉक्टर्स सर्जन, अस्थिरोग तज्ञ ,नेत्र रोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, जनरल मेडिसिन, नाक, कान, घसा तज्ञ तसेच तपासणी दरम्यान रुग्ण आढळल्यास शस्त्रक्रिया करण्यास योग्य पिवळ्या व केशरी रेशन कार्ड असलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतील. तरी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन उ.बा.ठा.सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.