मळगाव इथं ६ ऑक्टोबरला मोफत नेत्रतपासणी शिबीर

भाजप - शुभांगी ऑप्टिक्स सावंतवाडी यांचे आयोजन
Edited by: विनायक गांवस
Published on: October 04, 2024 14:59 PM
views 184  views

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी मळगांव व शुभांगी ऑप्टिक्स सावंतवाडी  यांच्या संयुक्त विद्यमाने मळगांव येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. मळगाव ग्रामपंचायतलगत असलेल्या पेडणेकर सभागृहात हे ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत हे आरोग्य शिबिर संपन्न होणार आहे. या शिबिरात डोळ्यांच्या सर्व तपासण्या  तसेच मोतीबिंदू तपासणी मोफत करण्यात येणार आहे. तर अत्यंत माफक व अत्यल्प दरात चष्मे  देखील उपलब्ध करण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त ग्रामस्थांनी या नेत्र तपासणी  शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर तसेच माजी सभापती राजू परब यांनी केले आहे.