कुणकेरीत २९ ऑक्टोबरला मोफत नेत्र तपासणी शिबीर !

जादूगार केतन कुमार यांच्या वाढदिवसाचं निमित्त
Edited by: विनायक गावस
Published on: October 26, 2023 16:38 PM
views 151  views

सावंतवाडी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी आणि केतन उदय सावंत मित्रमंडळ (जादूगार केतन कुमार) यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी २९ ऑक्टोबर २०२३ रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम कला क्रीडा विकास मंडळ कुणकेरी वाचनालय येथे सकाळी १०.०० ते सायं. ६.३० पर्यंत होणार आहे. तसेच दि.२८ ऑक्टोबर २०२३ रोजी दत्त मंदिर लिंगाचीवाडी कुणकेरी येथे वारकरी संप्रदाय हरिपाठ जय शंभो भजन मंडळ कुणकेरी यांचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा तसेच नेत्र तपासणी शिबीर चा देखील लाभ घ्यावा असे आवाहन केतन उदय सावंत यांच्यावतीने करण्यात आले आहे.