
सावंतवाडी : नॅब आय हॉस्पिटल सावंतवाडी येथे रोटरी क्लब सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. तसेच सर्वसामान्यांना परवडेल अशा अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे. भटवाडी येथील हॉस्पिटलमध्ये हे शिबीर संपन्न झाले. नागरिकांचा मोठा प्रतिसाद या उपक्रमास मिळाला. याप्रसंगी नॅबचे प्रेसिडेंट अनंत उचगावकर, सेक्रेटरी सोमनाथ जिगजिन्नी, रोटरी प्रेसिडेंट प्रमोद भागवत, खजिनदार राजन हावळ आदी उपस्थित होते.