सरंबळ इथं मोफत नेत्र तपासणी शिबिर..!

कुलस्वामिनी कृषी बचत गट सरंबळ यांच्या वतीने आयोजन
Edited by:
Published on: March 23, 2024 06:53 AM
views 420  views

कणकवली : कुलस्वामिनी कृषी सेवा बचत गट सरंबळ आणि नॅब नेत्र रुग्णालय, मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक २० मार्च २०२४ रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत गावडे सभागृह ग्रामपंचायत सरंबळ,तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास गावातील ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभला. शिबिरात एकूण ७७ जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी ८ जणांना मोतीबिंदू व २२ जणांना चष्म्याचे निदान करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन सरपंच रावजी कदम ग्रामपंचायत सरंबळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी सरंबळ पोलीस पाटील दिलीप वराडकर, पशुवैद्यकीय अधिकारी सरंबळ सुचित खवणेकर, पोस्टमास्तर अमृता पिंगुळकर, ग्रामसेविका अश्विनी कुंभार , नेत्रचिकित्सा टीमचे रमेश जगदाळे, कुलस्वामिनी कृषी बचत गटाचे अध्यक्ष अजय राणे, उपाध्यक्ष शामसुंदर परब, सचिव मंदार मोहिते तसेच बचत गटाचे सदस्य गुरुनाथ परब, समीर कदम, अमित झोरे, भिवा गावकर, सुहास सुर्वे, घनश्याम साटम, आनंद गावडे, अमित राणे, मनोज दांडकर, संतोष राणे, महादेव वंजारे व अंकुश परब हे उपस्थित होते. नेत्र तपासणी शिबिराला उपसरपंच सागर परब यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या तसेच सामाजिक कार्यकर्ते योगेश नाईक यांनी भेट देऊन शुभेच्छा व आर्थिक सहकार्य देखील केले. कुलस्वामिनी कृषी बचत गटाचे सचिव मंदार मोहिते यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.