
वैभववाडी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त येथील भाजपा कार्यालयात मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांच्या हस्ते संपन्न झाले.
श्री फडणवीस यांचा वाढदिवस संपूर्ण राज्यात सामाजिक उपक्रम राबवून साजरे होत आहेत. वैभववाडी भाजपाच्यावतीने यानिमित्त नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबीराच्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. तसेच आवश्यकता असलेल्यांना चष्मा दिला जाणार आहे. या शिबिराचा उद्घाटन सुधीर नकाशे यांनी केले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र साठे, प्राची तावडे, न. प. सभापती रोहन रावराणे, रणजित तावडे, दिगंबर पाटील, माजी उपनगराध्यक्ष संजय सावंत, शिवाजी राणे, सुभाष रावराणे, दीपक माईणकर, सिताराम पाटील, प्रदीप नारकर, अवधूत नारकर यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.