
सावंतवाडी : श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय, माजगाव येथे दहावींतील विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक मोबाईल अँप्सचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला.
या अॅपद्वारे विद्यार्थ्यांना बोर्डाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार सर्व विषयांची पाठ्यपुस्तके, प्रत्येक पाठाचा स्वाध्याय, मुद्देसूद उत्तरांसह मार्गदर्शन, अॅनिमेटेड व्हिडीओ लेक्चर्स, तसेच व्याकरण व लेखन कौशल्याचे प्रशिक्षण मिळणार आहे. या कार्यक्रमास रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. अॅड. सिद्धार्थ भांबुरे, सचिव रो. सिताराम तेली,रो. सुधीर नाईक, प्रदीप शेवडे तसेच रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष रो. सिद्धेश सावंत, सचिव रो. अवधूत राणे आणि खजिनदार रो. कुणाल सावंत, झेड.आर.आर भावेश भिसे, श्रिया मठकर, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी केलेल्या या उपक्रमाचे पालक आणि शिक्षकांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे.