
सावंतवाडी : भाजप माजी तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य संदीप एकनाथ गावडे यांच्या मार्फत तळवडे जिल्हा परिषद गटात मोफत वह्यावाटप कार्यक्रम घेण्यात आला. तळवडे, नेमळे, मळगाव मधील सर्व शाळा महाविद्यालयाचा २१०० विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. दरवर्षी संदिप गावडे यांचा माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येतो.
खूप शिका, मोठे व्हा. आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करा. देशाचे चांगले नागरिक बना, शिक्षक हे गुरुच्या ठिकाणी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आपली वाटचाल केली पाहीजे असे मार्गदर्शन संदीप गावडे यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी माजी सभापती पंकज पेडणेकर, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, मळगाव सरपंच हनुमंतप्रसाद पेडणेकर, शक्तीकेंद्र प्रमुख बाळा बुगडे, मंगलदास पेडणेकर, सर्व बूथ अध्यक्ष, गाव अध्यक्ष, महिला अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.