
वेंगुर्ले : भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील ४५ वारकरी संप्रदायातील मंडळींना मोफत देवदर्शन सहलीचा शुभारंभ आज शनिवार दिनांक १५ जुन रोजी सायंकाळी ५.३० वाजता चांदेरकर महाराज विठ्ठल मंदिर येथे होणार आहे.
मोहीनी एकादशी निमीत्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात विशाल परब यांनी वारकरी मंडळींना मोफत देवदर्शन सहल घडवून आणेन असे अभिवचन दिले होते. त्याचीच पुर्तता म्हणुन तुळजापूर - अक्कलकोट - पंढरपूर - नृहसिंहवाडी - महालक्ष्मी कोल्हापूर अशी तीन दिवसांची सहल आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायातील मंडळींमध्ये उस्ताहाचे वातावरण निर्माण झाले आहे.