वेताळ प्रतिष्ठानच्या जिल्हास्तरीय दौड स्पर्धेत फ्रँकी गोम्स आणि प्रियांका लाड अव्वल

Edited by: दिपेश परब
Published on: January 09, 2024 20:17 PM
views 264  views

वेंगुर्ले : वेताळ प्रतिष्ठान सिंधिदुर्ग तुळस आयोजित अश्वमेध तुळस महोत्सवांतर्गत सलग १० व्या वर्षी आयोजित जिल्हास्तरीय नव्या भविष्यासाठी भरड धान्य दौड स्पर्धेत खुल्या पुरुष गटातून फ्रँकी गोम्स (सावंतवाडी) तर खुल्या महिला गटातून प्रियांका लाड अव्वल क्रमांकाची मानकरी ठरली. शालेय मुली- मुलगे, व खुल्या पूरुष व महिला अशा एकूण १२ गटात आयोजित दौड स्पर्धेस जिल्ह्यातील सुमारे ३६८ स्पर्धकांनी सहभाग घेत उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

जिल्हास्तरीय नव्या भविष्यासाठी भरड धान्य दौड स्पर्धेचे उदघाटन दिपप्रज्वलन करून मुबई महानगर पालिका माजी नगरसेवक सगुण नाईक यांच्या आणि खर्डेकर कॉलेज चे प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि प्रतिमा पूजन करून  करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रा.बी.एम.भैरट, डॉ. बी.जी.गायकवाड, संजय पाटील, प्रतिष्ठान चे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव डॉ.सचिन परुळकर, निवृत्त पोलिस सुधीर चुडजी, प्रदीप परुळकर, महेश राऊळ, प्रसाद भणगे, सागर सावंत, किरण राऊळ ,सचिन गावडे, मंगेश सावंत, सद्गुरू सावंत, केशव सावंत,यशवंत राऊळ,सानिया वराडकर,वैष्णवी परुळकर,समीर राऊळ,मंगेश राऊळ,सचिन राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नव्या भविष्यासाठी भरड धान्य विषयक संदेश  देणारी क्रीडा ज्योत मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली.

सदर स्पर्धेत अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक खालील प्रमाणे  

इ.१ली-२री गट(मुली) प्रथम: हर्षिता गणपत सकपाळ (मठ,कणकेवाडी), द्वितीय: अदिती जगन्नाथ कांदे (जि.प.वजराठ न.१), तृतीय: साची नितीन सावंत (जि.प.वजराठ न. १), इ.१ली-२री गट( मुलगे) प्रथम: सर्वेश संतोष कापडी (आकेरी), द्वितीय: भावेश भागो खरात (गोवर्धन विद्या मंदिर,वडखोल), तृतीय: चैत्यन अरुण परब ( जि . प.वजराठ न.१), इ.३री-४थी गट (मुली) प्रथम: युक्ता सतीश राणे ( वजराट, पिंपळाचे भरड), द्वितीय: हर्षिता सत्यवान वेंगुर्लेकर ( टोपीवाला,मालवण), तृतीय: माधुरी दिलीप परब (जि.प. वजराट न.१), इ.३री-४थी गट ( मुलगे) प्रथम: एकांश बुधाजी तुळसकर (जैतिर विद्यालय,तुळस), द्वितीय: निहाल शिवराम पेडणेकर (होडावडे), तृतीय: मदन कृष्णा परब (गिरोबा,तुळस), इ.५वी-६वी गटा(मुली)प्रथम: महिमा विशाल मोहिते (जि.प.शाळा मालवण), द्वितीय : मान्यता संदीप पेडणेकर (जि.प.वेंगुर्ला न ३), तृतीय: श्रावणी यशवंत दळवी ( जनता विद्यालय, तळवडे), इ.५वी-६वी गट(मुलगे) प्रथम: गुरुनाथ रमाकांत मांजरेकर ( जनता विद्यालय, तळवडे)

द्वितीय: ज्ञानेश सुनील गावडे (जनता विद्यालय,तळवडे)

तृतीय: स्वराज साईकृष्ण कांदे (जि.प.वजराठ न. १), इ ७ वी-८ वी (मुली) प्रथम: विभावरी प्रशांत मांजरेकर (जनता विद्यालय, तळवडे), द्वितीय: प्रिया सुभाष मसुरकर ( मळेवाड हायस्कूल)

तृतीय: अलिषा सुरेश कुबल ( न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा), इ ७ वी-८ वी (मुलगे) प्रथम: चिन्मय महेश राणे ( आडेली हायस्कूल)

द्वितीय:चैत्यन महेश राणे (आडेली हायस्कूल), तृतीय: अथर्व संतोष राणे (जि.प. वजराठ न.१), इ ९ वी - १०वी (मुली) प्रथम: आर्या अप्पा कापडी (नेमळे हायस्कूल) 

द्वितीय: तन्वी महेश मुळीक (मळेवाड हायस्कूल) 

तृतीय: खुशी धनंजय गिरप (न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा), इ ९ वी - १०वी (मुलगे) प्रथम:यश महेश राणे (आडेली हायस्कूल)

द्वितीय: श्रीधर चंद्रकांत गावडे ( वेतोरे हायस्कूल)

तृतीय:बाळकृष्ण अशोक राऊळ (अणसुर पाल हायस्कूल) यांनी शालेय गटातील स्पर्धेत यश संपादन केले.

   खुला पुरुष गट प्रथम: फ्रँकी गोम्स (सावंतवाडी)

द्वितीय: दीपक मुकुंद फाले (ओरस) तृतीय:  विराज विठ्ठल गीते, खुला महिला गट

प्रथम:प्रियांका अनिल लाड (ओरस) द्वितीय: रसिका बाळकृष्ण परब (परपोली, सावंतवाडी) तृतीय: राजश्री सुरेश पाटील (ओरस) या अव्वल ठरत प्रथम तीन क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.

यावेळी उद्घाटक  सगुण नाईक यांनी प्रतिष्ठांन च्या माध्यमातून कला ,क्रीडा, सांस्कृतिक  व शैक्षणिक  उपक्रमा बरोबरच अनेक सामाजिक उपक्रम राबवून सलग दहा वर्षे आदर्शवत कार्य करत आहे असे गौरोवोद्गार काढत प्रतिष्ठानचे अभिनंदन केले. तर प्राचार्य डॉ. एम.बी.चौगले यांनी बाल आणि युवक युवतींना खरा आदर्श वेताळ प्रतिष्ठान देत आहे त्याबद्दल ऋण व्यक्त केले.

सर्व विजेत्या स्पर्धकांना २१ जानेवारी रोजी मान्यवरच्या हस्ते बक्षिस देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रज्वल परुळकर, सौरभ सावंत,राजू परुळकर,अर्जुन गावडे, चिंतामणी तामबोसकर भक्ती भणगे,विधी नाईक, आशिष नाईक, नाना सावळ,प्रतिक परुळकर, मनोज आंगणे,सिद्धेश तुळसकर,मानस कोरगावकर, गौरेश आरमारकर, गणेश सावंत,विनायक सावंत, सुहास सावंत, प्रमोद तांबोसकर, नाना राऊळ,चिन्मय चौधरी, अमित तंबोसकर, कुंदा सावंत,मिलन तिरोडकर, जान्हवी सावंत,वेदिका  होडावडेकर, हेमलता राऊळ,मंदार नाईक,मिताली नाईक,अक्षता गावडे,गणेश राऊळ यांनी मेहनत घेतली.सूत्रसंचालन गुरुदास तिरोडकर तर आभार माधव तुळसकर यांनी मानले.