SPK त साजरा केला 'संस्थापक दिन' | श्रीमंत राजेसाहेब शिवरामराजे भोंसले यांच्या जयंतीचं औचित्य

Edited by: विनायक गावस
Published on: August 13, 2023 18:53 PM
views 124  views

सावंतवाडी : श्रीमंत राजेसाहेब शिवरामराजे भोंसले यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये 13 ऑगस्ट हा दिवस 'संस्थापक दिन' म्हणून साजरा करण्यात आला. 

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचालीत श्री पंचम खेमराज महाविद्यालयय सावंतवाडी येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब शिवरामराजे भोंसले यांची 96 वी जयंती महाविद्यालयामध्ये  "संस्थापक दिन" म्हणून साजरी करण्यात आली. या 'संस्थापक दिन' कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले यांनी भूषविल होते.

प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित उच्चशिक्षण कोकण विभाग, पनवेल सहसंचालक डॉ. केशव तुपे यांनी "उच्च शिक्षण सद्यस्थिती आणि आव्हाने" या विषयावर मार्गदर्शन केलं. याप्रसंगी राजेसाहेब खेमसावंत भोसले, राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, अँड.शामराव सावंत, राजू मसुरकर, डॉ. सतिश सावंत, प्राचार्य डॉ. दिलीप भारमल, प्रा. ठाकुर आदी उपस्थित होते.