![](https://kokansadlive.com/uploads/article/5450_pic_20230810.1939.jpg)
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीत 'संस्थापक दिन २०२३' साजरा करण्यात येणार आहे. लेफ्ट. कर्नल हि. हा. श्रीमंत शिवरामराजे भोंसले (राजेसाहेब) यांची ९६ वी जयंती रविवार १३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ०९.३० वा. महाविद्यालयामध्ये संस्थापक दिन म्हणून साजरी करण्यात येणार आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान श्रीमंत खेमसावंत भोंसले राजाबहाद्दूर हे भूषविणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. केशव तूपे. सहसंचालक, उच्चशिक्षण कोकण विभाग पनवेल हे उपस्थित राहून “उच्चशिक्षण: सद्यस्थिती आणि आव्हाने" या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन ह.हा. श्रीमंत शुभदादेवी भोंसले (राणीसाहेब), युवराज लखमसावंत खेमसावंत भोंसले कार्यकारी विश्वस्त,युवराज्ञी श्रद्धाराजे लखमसावंत भोंसले विश्वस्त तसेच सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी नियामक मंडळ सदस्य व सर्व सभासद प्राचार्य, श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी यांनी केल आहे.