बांदेकर फाईन आर्ट कॉलेजमध्ये फाऊंडेशन कोर्स...!

Edited by: विनायाक गावस
Published on: June 25, 2023 14:06 PM
views 77  views

सावंतवाडी : डी. जी. बांदेकर ट्रस्ट, सावंतवाडी आणि बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट सावंतवाडी, या महाविद्यालयातर्फे कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यकालीन करिअर साठी उपयुक्त असा फाऊंडेशन कोर्स यावर्षी प्रथमच सावंतवाडीत सुरू करीत आहे.

सिंधुदुर्गातील एकमेव कलेची पदवी देणारे महाविद्यालय म्हणून गेली २५ वर्ष या क्षेत्रात हे महाविद्यालय आपला ठसा उमटवून आहे. आज मितीपर्यंत ६५० विद्यार्थी या महाविद्यालयातून उपयोजित कलेची पदवी घेऊन मोठ्या शहरात आपले व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव मानाने मिरवत आहेत.

या क्षेत्राकडे वळताना सीईटी परीक्षेविषयी पूर्व कल्पना व तयारी होण्याच्या दृष्टीने हा एक वर्षाचा फाऊंडेशन कोर्स खूप उपयुक्त ठरणार आहे. बदलत्या शिक्षण प्रकाराबरोबर नवनवीन तंत्रज्ञान आणि कल्पना या गोष्टींकडे पाहता UI UX, computer softwares, art, craft, clay modelling, Animation अशा गोष्टी या कोर्समध्ये  विद्यार्थ्यांना शिकता येतील. आणि मुख्य म्हणजे या कोर्स करिता कोणत्याही सीईटी परीक्षेची अट नसल्याने केवळ १० वी व १२ वी इयत्ता पूर्ण केलेला विद्यार्थी सहजपणे या कोर्स साठी प्रवेश घेऊ शकतो.

येत्या जून महिन्यापासून या फाऊंडेशन कोर्स ची सुरुवात होणार असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कला क्षेत्राकडे वळून आपले योग्य करिअर निवडावे असे आवाहन महाविद्यालयाचे चेअरमन  श्री. रमेश भाट यांनी केले आहे.

 कलेला पूरक असे वातावरण असणाऱ्या सावंतवाडीत बरेच मोठमोठे कलाकार होऊन गेले आणि आजही नवनवीन कलाकार घडत आहेत.

आपल्या पाल्याच्या १० वी नंतर किंवा १२ वी नंतर या कोर्स साठी आपण प्रवेश घेऊ शकता.

अधिक माहितीसाठी श्री. तुकाराम मोरजकर ९४०५८३०२८८ व श्री. सिद्धेश नेरुरकर ९४२०२६०९०३ या क्रमांकावर संपर्क साधावा.