माजी सरपंच सुभाष शेट्ये यांचं निधन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 05, 2023 21:39 PM
views 589  views

देवगड : गढीताम्हाणे तेलीवाडी येथील माजी सरपंच कै.सुभाष हरी शेट्ये यांचे दिनांक ३१-०८-२०२३ अल्पश्या आजाराने मुंबई येथील हॉस्पिटल मध्ये दुःखद निधन झाले.

त्यांच्या पश्चात १ मुलगा, २मुली, पत्नी, भाऊ, पुतणे असा परिवार आहे. सुभाष शेट्ये हे दिलखुलास व्यक्तिमत्वाचे होते. मनमिळाऊ स्वभाव असल्यामुळे ते प्रत्येकावर आपली छाप सोडत असत,भाजप पक्षाचे ते कार्यकर्ते होते.