
सावंतवाडी : श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा.डॉ. द. रा. कळसुळकर यांचे मध्यरात्री वृद्धापकाळाने निधन झाले. कळसुलकर इंग्लिश स्कूल प्रशालेचे ते माजी विद्यार्थी होते. तसेच निवृत्त उच्च माध्यमिक विभाग प्रमुख श्रीमती कळसुलकर यांचे ते पती होत. त्यांच्या पश्चात मुल, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.










