BIG BREAKING | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताच्या निमित्तानं निलेश राणे आणि उदय सामंत एकत्र !

अनेकांच्या भुवया उंचावल्या !
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 16, 2022 15:27 PM
views 466  views

रत्नागिरी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शुक्रवारी रत्नागिरीत आगमन झाले. यावेळी भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. याचं दरम्यान राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आणि माजी खासदार निलेश राणे एकत्र आले. या भेटीमुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

खरं तर राणे कुटुंब आणि सामंत कुटुंब यांचे तसे खूप चांगले संबंध होते. मात्र, २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हे संबंध खूपच ताणले गेले. या दरम्यान, निलेश राणे आणि उदय सामंत यांच्यात अनेकदा शाब्दिक चकमक झाली. दोघांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची संधी सोडली गेली नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या रुपाने राज्यात सत्तातर झाल्यानंतर चित्र पलटले. आणि काल परवा राजकारणात एकमेकांचे शत्रू असणारे मित्र झाले. आणि तसचं चित्र तळ कोकणात बदलल. त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल सर्वात प्रथम राणे आणि केसरकर यांच्यात मनोमिलन झालं. आणि त्यांनतर लक्ष होत ते म्हणजे निलेश राणे आणि उदय सामंत यांच्याकडे. अखेर आज तो मुहूर्त साधून आला. मुख्यमंत्री आज एक दिवसीय रत्नागिरी दौऱ्यावर आले असता, त्याच्या स्वागतासाठी निलेश राणे आले. त्यांचं स्वागत करताना निलेश राणे आणि मंत्री उदय सामंत एकत्र दिसले. त्यामुळे राजकीय भुवया उंचावल्या आहेत.

यावेळी पालकमंत्री व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबतच कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सदानंद सरवणकर, चिपळूणचे आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, फारुख शाह, चिपळूणच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर आदी उपस्थित होते.