
सावर्डे : श्रीराम जन्मोत्सवानिमित्त सावर्डे,येथील कासारवाडीतील राम मंदिराचे बाजूला मल्टीपरपज हॉल साठी माजी कृषी अधिकारी विजय पोकळे यांनी आपल्या स्वतःच्या मालकीची ५ गुंठे जमीन रामनवमी दिवसाचे औचित्य साधून दान केली. हा राम जन्मोत्सव पारंपारिक पद्धतीने दणक्यात साजरा करण्यात आला. यावेळी जेष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. शेखर निकम यांच्या हस्ते विजय पोकळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. विजय यांनी दान केलेल्या जमिनीच्या फलकाचे अनावरण आम. शेखर निकम यांच्या हस्ते व तुकाराम पोकळे यांचे उपस्थितीत करण्यात आले.
यापुर्वी या मंदिरा उभारणी करण्यासाठी तुकाराम पोकळे व त्याचे बंधू यांनी आपल्या मालकीची ११ गुंठे जागा दीली होती. त्या मंदिरात दरवर्षी रामनवमीला जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. या राममंदिर मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. या मंडळाने काळाची गरज लक्षात घेऊन या मंदिराशेजारी मल्टीपरपज हाँल बांधण्याचा संकल्प केला असून त्यासाठी लागणारी जागा राम जन्मोत्सवाचे औचित्य साधून विजय पोकळे यांनी आपल्या मालकीची पाच गुंठे जमिन दान केली.