
सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक मोती तलावात निदर्शनास येत असलेल्या मगरीला पकडण्यासाठी वनविभागाने 'सापळा ' लावला होता. मात्र, यात वनविभागाला यश आले नाही. रविवारी पुन्हा एकदा मगरीन त्याच संगीत कारंजावर येऊन बसत दर्शन दिल आहे.
नागरिकांच्या भीतीचा विषय ठरलेली ही मगर वनविभागाकडून लावण्यात आलेल्या सापळ्यात अडकेल अस वाटल होत. मात्र, त्यात वनविभागाला यश आल नाही. आज रविवार दुपारी १२.३० च्या सुमारास या मगरीन पुन्हा दर्शन देत आपल अस्तित्व दाखवल आहे. काही दिवसांपूर्वी वनविभागाच्या जलद कृती दलाकडून तलावात बोटीच्या सहाय्याने पाहणी करण्यात आली होती. मात्र, त्यांना तलावात कोठेही मगरीचे वास्तव्य आढळून आले नाही. आज मात्र तिने पुन्हा एकदा संगीत कारंजावर बसत आपल अस्तित्व दाखवल आहे. ही मगर वनविभागाच्या सापळ्यात कैद न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गणेशोत्सव तोंडावर असून शहरातील बहुतांश गणपतींचे विसर्जन मोठी तलावात याच ठिकाणी केले जाते. अशावेळी मगरींपासून कोणाला धोका पोहोचू नये यासाठी वनविभागाकडून तातडीन खबरदारी घेण्यात यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. या मगरीला जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यावे असे आवाहन नागरिकांनी केले आहे.