देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी रत्नागिरी - सिंधुदुर्गातून महायुतीचा खासदार विक्रमी मताधिक्यानी लोकसभेत पाठवूया : संदिप गावडे

Edited by: विनायक गांवस
Published on: April 12, 2024 10:42 AM
views 355  views

सावंतवाडी : तालुक्यातील महायुतीचा पहिला पंचायत समिती स्तरावरील कार्यकर्ता मेळावा बावळाट येथे संपन्न झाला. यावेळी भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केल. यावेळी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्गातून महायुतीचा खासदार विक्रमी मताधिक्यानी लोकसभेत पाठवूया व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवून भारत देशाला महासत्ता बनवूया असं आवाहन त्यांनी केलं. बावळाट येथील महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, तालुका प्रमुख बबन राणे, मंडळ अध्यक्ष रवि मडगावकर, विनायक दळवी, दया परब, ऍड.विठ्ठल परब, सातुळी सरपंच सौ. परब, उपसरपंच स्वप्नील परब, विलवडे सरपंच प्रकाश दळवी, भालावल सरपंच समीर परब, भालावल उपसरपंच अर्जुन परब, सरमळे सरपंच विजय गावडे, देवसू सरपंच रुपेश सावंत, केसरी सरपंच सौ. स्नेहल कासले, उपसरपंच संदिप पाटील, शक्ती केंद्र प्रमूख मनीष परब, विश्वास नाईक, दीपक पास्ते, प्रदीप दळवी, मोहन दळवी, परेश धरणे, आत्माराम दळवी, सौ.रुचिरा परब, सुभाष सावंत, कृष्णा गवस, विजय जंगले, शक्ती केंद्र प्रमुख भरत गोरे, भिवा सावंत, गुरुनाथ कासले, दीपक पाटील, सखाराम खरात, प्रभाकर सावंत, उप तालुका अध्यक्ष अमोल सावंत, अशोक सावंत, शांताराम सावंत, प्रसाद सुकी, प्रशांत सुकी, उत्तम परब, दिना कशाळीकर, निशा बिले, सखाराम माळकर, गणपत परब, उदय परब, गोपाळ परब, सागर परब, परेश परब, महेंद्र परब, सुभाष परब, सुनील परब आदी ग्रमस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.