सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन वरील चर ठरतायेत प्रवाशांना जीवघेणे..!

प्रवासी संघर्ष समितीने वेधले रेल्वे प्रशासन आणि ठेकेदार अभियंत्यांचे लक्ष..!
Edited by:
Published on: May 26, 2024 09:35 AM
views 157  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरण कामांमध्ये अनेक ठिकाणी जागोजागी चर ठेवल्यामुळे पडलेल्या अवकाळी पावसात अनेक प्रवासी पडले. रात्रीच्या वेळी वीज लाईट नसल्यामुळे स्टेशनवर जाणाऱ्या फुटपाथमधील खडबडीत उतारामुळे जेष्ट ,अपंग व महिला प्रवाशांना या जागेतून चालणे कठीण होत आहे. याकडे ठेकेदार बांधकाम विभाग किंवा रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष समिती आणि सिंधुदुर्ग नगरी प्रवासी संघटना यांच्या माध्यमातून तात्पुरती सोय करून प्रशासनाला जाग आणली.याबाबत दखल न घेतल्यात लक्षवेधी आंदोलन छेडण्याचा इशारा सिंधुदुर्ग जिल्हाप्रवासीसंघर्ष समिती संघटनेचेअध्यक्ष प्रकाश पावसकर यांनी दिला आहे.

सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन परिसरात सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. या सुशोभीकरणाच्या दिरंगाई कामकाजामुळे आणि जागोजागी ठेवलेल्या चरामुळे तसेच रात्रीच्या या कामामध्ये लाईट नसल्यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी कुचंबणा होत आहे.अवकाळी पाऊस आणि रेल्वेच्या कामकाजामुळे सध्या मांडवी किंवा अन्य रेल्वे उशिराने धावत आहेत.सायंकाळी उशिरा येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना याचा त्रास होताना दिसत आहे. याकडे काल सिंधुदुर्ग जिल्हा प्रवासी संघर्ष समितीची बैठक ओरोस येथे अध्यक्ष प्रकाश पावसकर यांच्या अध्यक्षते खाली पार पडली.या बैठकीत प्रवासी संघर्ष समितीचे नंदन वेंगुर्लेकर ,संतोष वालावलकर ,नागेश ओरसकर , मिहीर मठकर ,साई आंबेरकर संजय वालावलकर ,सुभाष शिरोडकर ,बाळा कांदळकर ,सुनील पाताडे आदीसह संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

यावेळी झालेल्या बैठकीत सिंधुदुर्ग स्टेशनवर जलद गाड्यांना थांबा,पि आर ओ सिस्टीम,तसेच प्रवाशांच्या योग्य सेवा सुविधा द्याव्यात या मागणीबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले आहे.त्यांनी लोकसभा आचारसंहिता संपताच या प्रश्नाबाबत आपण मुंबईत खास रेल्वे अधिकाऱ्यांशी बैठक घेऊ असे आश्वासन दिले होते या सह अन्य प्रश्नांबाबत रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या २७ रोजी जिल्हाधिकारी आणि सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनचे अधिकारी यांना लक्षवेधी निवेदन देण्याचे ठरले. या स्टेशनवर सध्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे अवकाळी पावसाने या कामालगत मारलेला चर आणि साचलेल्या पाण्याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसला. रात्रीच्या वेळी या ठिकाणी  काळोखाचे साम्राज्य पसरल्यामुळे अनेक प्रवाशांना त्याचा त्रास होत आहे अशी तक्रार प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाच्या अधिकारी आणि बांधकाम अधिकारी तसेच ठेकेदार यांचे लक्ष वेधून केली. याबरोबर वैभववाडी रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन येथील जलद गाड्यांना थांबा मिळावा, सावंतवाडी येथील टर्मिनलचे काम प्रलंबित आहे,कसाल येथील रेल्वे स्टेशनचे मागणीबाबत अद्यापही रेल्वे प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे एक जून रोजी तीन वाजता रेल्वे स्टेशनच्या नियोजित जागेवर पंचक्रोशी ग्रामस्थ आणि संघर्ष समिती कसाल रेल्वे प्रवासी समिती यांच्या समवेत लक्ष वेधण्यासाठी छोटेखानी धरणे आंदोलन करण्याचे निश्चित केले.तसेच कुडाळ व कणकवली येथील समित्या पुनर्बांधणी बाबत चर्चा झाली.वैभववाडी येथे कोल्हापूर जोडणारा रेल्वे मार्ग प्रस्तावित असून वैभववाडी आणि आर्चीणे रेल्वे स्टेशन जोडणारे रस्ते जागोजागी खराब आहेत.येथील रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांना गंजलेल्या पाईपलाईन द्वारे पाणी प्यावे लागत आहे.त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून आरोग्य प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी करूनही अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. या सह रस्त्यांची रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर हाती घ्यावी याबाबत रेल्वे प्रशासनाचे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्याचे ठरले.

रेल्वे प्रशासनाने सिंधुदुर्ग वैभववाडी आणि सावंतवाडी या तीनही रेल्वे स्टेशनवर पि आर ओ सिस्टीम मंजुरी प्रतीक्षेत आहे. याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करावी, तसेच महाराष्ट्रातून कोकणातून जाणाऱ्या 15 अतिजलद व 10 एकाच दुसरा स्टेशन घेणारे रेल्वे  जलद रेल्वे गाड्यांच्या थांब्याबाबत लक्ष वेधूनही अद्यापही प्रशासनाने लक्ष दिले नाही याबाबत रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे ठरले.