SPK च्या खाद्य महोत्सवाला तुफान प्रतिसाद

Edited by: विनायक गांवस
Published on: January 22, 2025 11:43 AM
views 104  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. एकूण 36 स्टाॅल्स महाविद्यालयाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आले होते. यामध्ये मोदक, खरवस, अळुवड्या, घावणे उसळ, आंबोळी, कोंबडी वडे, कोकम सरबत, सोलकढी, प्रॉन्स, चिकन असे विविध मालवणी पदार्थ विद्यार्थ्यानी तयार केले होते.

या खाद्य महोत्सवाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त श्रद्धाराजे भोंसले यांच्या हस्ते करण्यात आले.  या कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमराजे सावंत भोंसले , संस्थेचे सहाय्यक संचालक अॅड. शामराव सावंत, सदस्य जयप्रकाश सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल, महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या महोत्सवामध्ये कोकणी पदार्था व्यतिरिक्त गुजराती, राजस्थानी पदार्थ विद्यार्थ्यांनी बनवलेले होते. या खाद्य महोत्सवाला विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला.