लोककला कोकणच्या समृध्द संस्कृतीचा वारसा : विवेकानंद नाईक

Edited by: संदीप देसाई
Published on: February 04, 2024 13:59 PM
views 103  views

दोडामार्ग : आपल्या लोककला याच कोकणच्या समृध्द संस्कृतीचा वारसा आहेत. त्यामुळे त्या जतन केल्या पाहिजेत, त्यांचा जागर झाला पाहिजे नव्हे तर त्या पिढ्यान् पिढ्या पुढे जाव्यात यासाठी लोकोत्सव सारखे उपक्रम सातत्याने झाले पाहिजेत असे प्रतिपादन दोडामार्ग तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत आणि उद्योजक विवेकानंद नाईक यांनी केले. 

इतकंच नव्हे शासनाकडून कलाकारांना दिले जाणारे मानधन अगदीच तुटपुंजे आहे. ती भीक न देता महिना दहा ते पंधरा हजार मानधन दिले पाहिजे तरच येथील लोककला जिवंत राहतील. नुसते दशावतार आणि भजनी कला क्षेत्रापुरत मर्यादित न राहता कोकणातील लोककला नीच्छित करून त्या सादर करणाऱ्यां कलाकारांनाही शासनाने आर्थिक सहकार्य केले पाहिजे, जेणेकरून लोककला भक्कमपणे उभी राहील आणि आपली लोक संस्कृती अबाधित राहाण्यास मदत होईल, अशी अपेक्क्षा नाईक यांनी व्यक्त केली. इतकचं नव्हे तर जिल्ह्यात लोककला जागर करण्यासाठी राबविण्यात आलेल्या लोकोत्सव कार्यक्रमाला तब्बल ५० हजारांची देणगी जाहीर करत आपण तहायात असे पर्यंत या या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.

दोडामार्ग तालुक्यात प्रथम आयोजित केलेल्या सांस्कृतिक लोककला महोत्सव उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.  सिंधुदुर्ग सांस्कृतिक लोककला मंच दोडामार्ग यांनी प्रथमच सरगवे खंडोबा मंदिर सभागृहात दोन दिवसीय सांस्कृतिक लोककला महोत्सव आयोजित करण्यात आलाय.  याचे उद्घाटन विवेकानंद नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र शासन रंगभूमी सेन्सॉर बोर्डचे सदस्य व माजी गटविकास अधिकारी विजय चव्हाण, शिवसेना उध्दव ठाकरे उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, शिवसेना पदाधिकारी राजेंद्र निंबाळकर, माजी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, दैनिक कोकणसाद चे संपादक व दोडामार्ग पत्रकार समितीचे अध्यक्ष संदीप देसाई, शिवसेना उध्दव ठाकरे तालुका प्रमुख संजय गवस, युवा तालुका प्रमुख मदन राणे, रमाकांत जाधव, विठोबा पालयेकर, नारायण नाईक, झरे सरपंच श्रृती देसाई, झरेबांबर सरपंच अनिल शेटकर, मधुकर सावंत, श्रीधर सावंत, अंकुश कविटकर, सखाराम सावंत, शंकर देसाई, लोकमान्य शाखा अधिकारी विष्णू देसाई, महेश गवस, पञकार तुळशीदास नाईक, रामदास मेस्त्री, भिसे, रामकृष्ण दळवी, निवृत्त नायब तहसीलदार सत्यवान गवस, विलास सावळ, आदी मंडळी उपस्थित होती. 

यावेळी विवेकानंद नाईक म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून दोडामार्ग तालुक्यातील गावागावात पारंपरिक लोककला जोपासल्या जात आहेत. आर्थिक परिस्थिती नसताना झरेबांबर येथील जेष्ठ व्यक्ती लक्ष्मण नाईक यांनी पन्नास वर्षे दशावतार नाट्य कंपनी चालवली, अशा व्यक्ती यांचा सन्मान होणे गरजेचे आहे. 

विजय चव्हाण यांनी अध्यक्षीय भाषणात आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोककला भरपूर आहेत. मात्र दोडामार्ग चे यात वेगळेपणं आहे. जिल्ह्यातील महाराष्ट्र शासन रंगभूमी सेन्सॉर बोर्ड सदस्य या नात्याने येथील पारंपरिक लोककला  महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, राज्यातील घराघरात पोहचली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. येथील कला त्याचे महत्त्व आपण सरकार पर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. इतकचं नव्हे तर येथील जेष्ठ कलाकार आहेत यांचा राज्य स्तरावर सन्मान झाला पाहिजे यासाठी प्रस्ताव सादर करन्याचे त्यांनी आवाहन केल. आपल्या कलेचे लहान मोठे व्हिडिओ तयार करून ते शासनाच्या विविध महोत्सव स्पर्धा, शॉर्ट फिल्म यामध्ये सादरीकरण केलं पाहिजे, सोशल नेटवर्किंग वर टाकले पाहिजे असे आवाहन  चव्हाण यांनी केलं. पारंपारिक लोककला जीवंत ठेवण्यासाठी आजच्या पिढीने दुसऱ्या पिढीला, दुसऱ्या पिढीने तिसऱ्या पिढीला ही कला शिकवली पाहिजे तरच ही कला यापुढे चालू राहणार आहे. दोडामार्ग सारख्या तालुक्यात हा या संस्थेने उपक्रम राबवला याबाबत विजय चव्हाण यांनी आयोजकांना शुभेच्छा दिल्या. 

यावेळी बाबुराव धुरी, अंकुश जाधव, राजेंद्र निंबाळकर, संजय गवस, अनिल शेटकर, सत्यवान गवस, श्रृती देसाई व इतरांनी आपले मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ नाट्यकर्मी  झरेबांबर दशावतार कंपनीने मालक जे गेली पन्नास वर्षे कंपनी चालवतात ते लक्ष्मण नाईक यांचा सामाजिक कार्यकर्ते उद्योजक विवेकानंद नाईक यांच्या हस्ते शाल श्रीफळ मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. इतरांचाही सत्कार करण्यात आला. 

यावेळी सिंधुदुर्ग सांस्कृतिक लोककला मंच दोडामार्गचे शंकर जाधव, विनिता देसाई, महादेव सुतार, सागर नाईक, विलास आईर, महेश पारधी, संदीप जाधव, संजय सुतार, संजय गवस, शांताराम बेनकर, देविदास सुतार, अशोक गवस, भगवान नाईक, कल्पेश करमळकर, मनिषा नाईक, साक्षी नाईक उपस्थित होत्या. यावेळी अनेक गावातील कलाकार यांनी आपल्या पारंपरिक लोककला सादर केल्या सुञसंचालन तेजस देसाई यांनी केले तर शंकर जाधव यांनी आभार मानले.