
सावंतवाडी : 'फ्लाईंग टॉटस्' डिजिटल प्री प्रायमरी स्कूल खासकीलवाडा, सावंतवाडी या स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळी चिमुकल्यांनी 'फेस्टिवल ऑफ इंडिया' या थीमवर विविध कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले व एड्यूस्मार्ट इंकचे एम. डी. कल्पेश पाटील उपस्थित होते.
यावेळी 'फ्लाईंग टॉटस्' व स्मार्ट किड्स अॅक्टिविटी सेंटरमध्ये झालेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अॅबॅकस स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या 'फ्लाईंग टॉटस्' स्कूलच्या अद्विता पांडुरंग चंदनशिवे, सलोनी रीतेश हावळ व कृतिका सिद्धनाथ कदम या विद्यार्थिनींनाही गौरवण्यात आले. तसेच अॅबॅकसमध्ये यश मिळवणाऱ्या फ्लाईंग टॉटस् स्कूलचा विद्यार्थी आराध्य संदीप तळेकर यालाही गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला विविध मान्यवर व पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. स्कूलच्या मुख्याध्यापिका सपना पिंगे यांनी आभार मानले.