लोरे नं२ गावचे ध्वजारोहण युवतीच्या हस्ते | सरपंच विलास नावळे यांचा आदर्शवत निर्णय

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: January 27, 2024 13:28 PM
views 352  views

वैभववाडी : प्रजासत्ताक दिनी लोरे नं२ गावच्या ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण गावातील युवती कोमल गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले.नुकत्याच पोस्ट खात्यात रुजु झालेल्या या युवतीच्या हस्ते सरपंच विलास नावळे यांनी ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेतला.त्यांच्या निर्णयाच सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

देशात शुक्रवारी ता.२६जानेवारी रोजी ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला.या दिनी वैभववाडी तालुक्यातील लोरे नं२ गावने एक आदर्श घालून दिला.यावर्षीचे ध्वजारोहण गावच्या युवतीच्या हस्ते करण्याचा निर्णय घेण्यात आला. पोस्ट खात्यात रुजु झालेल्या युवतीच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले.दरवर्षी गावात चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला झेंडा फडविण्याचा मान दिला जातो. तीच परंपरा कायम यावर्षी देखील श्री.नावळे यांनी कायम ठेवली.या ध्वजारोहण कार्यक्रमाला सरपंच विलास नावळे उपसरपंच रुपेश पाचकुडे, माजी जि.प.सदस्या दिव्या पाचकुडे,  ग्रा प सदस्य रितेश सुतार ,विनोद पेडणेकर , शुभांगी कुडतरकर,  सुप्रिया रावराणे, सुरेखा शिवगण  तंटामुक्ती अध्यक्ष अनिल नराम, पोलिस पाटील लवू रावराणे  माजी सरपंच महेंद्र रावराणे,अमरसिंह रावराणे  माजी उपसरपंच उपसरपंच नाना रावराणे,  सुरेंद्र रावराणे सोसायटी चेअरमन  छोटू रावराणे, सचिव श्री.वाडेकर, पोष्ट मास्तर विश्वास पेडणेकर, सर्व आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस आरोग्य कर्मचारी सर्व शाळांचे शिक्षक तसेच विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने  ग्रामस्थ उपस्थित होते.