बांद्यात अन्वर खान यांच्या हस्ते ध्वजारोहण

शिला फलक अनावरणाचा माजी सैनिक गोविंद वराडकर यांना मान
Edited by: विनायक गावस
Published on: August 14, 2023 14:47 PM
views 98  views

सावंतवाडी : 'मेरी मिट्टी मेरा देश' देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी समारोप अभियान या उपक्रमा अंतर्गत आज बांदा ग्रामपंचायतीच्या वतीने ध्वज वंदन, शिला फलक अनावरण, वृक्षारोपण,पंचप्रण शपथ कार्यक्रम संपन्न झाले.


आज सकाळी ८ वाजता ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान यांच्याहस्ते ध्वजरोहण करण्यात आले.तर शिला फलक अनावरण माजी सैनिक गोविंद वराडकर यांच्याहस्ते करण्यात आले. वसुधा वंदन अंतर्गत आतलबिहारी वाजपेयी उद्यानात ७५ औषधी व मसाले वृक्षांची लागवड करण्यात आली.तसेच कलशामध्ये गावातील माती गोळा करण्यात आली. सौ.रुपाली शिरसाट यांनी पंच प्रण शपथ दिली. तर येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं. १ च्या विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर कार्यक्रम सादर केले.

यावेळी सरपंच प्रियांका नाईक,उपसरपंच जावेद खतीब,ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर,सौ.रुपाली शिरसाट,राजाराम उर्फ आबा धारगळकर,रत्नाकर आगलावे, प्रशांत बांदेकर,शामसुंदर मांजरेकर,देवल येडवे,अरुणा सावंत,दीपलक्ष्मी पटेकर,तनुजा वराडकर,शिल्पा परब,रिया येडवे,ग्रामसेवक लीला मोर्ये,तलाठी फिरोज खान,सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अनय स्वार,  ग्रामपंचायत कर्मचारी संजय सावंत यांच्यासह ज्येष्ठ नागरिक,माजी सैनिक आणि बांदा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.