चिवलाबीच स्मशानभूमीतील समस्या दूर

माजी बांधकाम सभापती यतीन खोत, महेश जावकर यांचा पाठपुरावा
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 05, 2023 18:40 PM
views 304  views

मालवण : शहरातील चिवला बीच स्मशानभूमीत शवदहिनीच्या लोखंडी पारई मागील वर्षभर खराब झाल्या होत्या. याबाबत शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी केलेल्या पाठपूराव्यामुळे या पारई उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गुरुवारी या पारई येथे बसवण्यात आल्या. या कामी खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांचे सहकार्य लाभले, अशी माहिती श्री. जावकर यांनी दिली आहे.