स्नेह इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नोकरी उपलब्ध

2021-22 च्या विद्यार्थ्यांचा सर्वोत्तम निकाल
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 08, 2023 13:20 PM
views 257  views

स्नेह इन्स्टिटय़ुट ऑफ़ हॉटेल मॅनेजमेंट कणकवली निकालाची परंपरा जपून वर्ष 2021-22 चा सर्वोत्तम निकाल मिळविला असून या मागील सर्व विद्यार्थ्यांचे ट्रेनिंग व प्लेसमेंट हे मुंबई, गोवा, कोल्हापूर, दुबई, येथील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये करण्यात आले; यात अनिष शेट्ये,साहिल सावंत, संकेत चव्हाण आयटीसी फॉर्चुन ठाणे, श्रेयश कुबडे मॅरियट गोवा, भाग्यश्री तवटे फाईव्ह जुमेराह दुबई, आश्विनी गावकर सोफिटेल मुंबई, भक्ती तेली सयाजी कोल्हापूर, तिशा पालकर सीटीझेन हॉटेल मुंबई अशा विविध हॉटेलमध्ये कार्यरत आहेत. 

वरील व इतर सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करून संस्थेचे प्राचार्य शेफ अमित टकले व संस्थापक शशिकांत मुणगेकर यांनी जिल्ह्यातील युवक युवतींनी व्यवसायभिमुख शिक्षनाकडे वळण्याचे आवाहन केले.