
देवगड : देवगड येथील कुणकेश्वर किनालपट्टीवर परजिल्ह्यातील पर्ससीन नौकां अतिक्रमण करून घुसखोरी करत किनारपट्टीवरील ७ ते ८ वावात मासेमारी करीत असल्याचे गुरुवारी सकाळी निदर्शनास आले. यावर पारंपरिक मच्छीमार आणि रापण संघ प्रतिनिधी आक्रमक होऊन मत्स्य परवाना अधिकारी यांना धारेवर धरून या बाबत जाब विचारला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौसेना दिन साजरा होत असल्याने १ डिसेंबर रोजी जाहीर केलेले उपोषण स्थगित न करता कोणत्याही वळेस मालवण येथील सहायक आयुक्त कार्यासमोर उपोषण छेडण्यात येईल व त्यात संघर्ष निर्माण झाल्यास सर्वस्वी संबंधित प्रशासकीय व्यवस्था जबाबदार असेल असा इशाराही देवगड मत्स्य परवाना अधिकारी यांना पारंपरिक मच्छिमार व रापण संघ प्रतिनिधी यांनी दिला.
पर्सनीन नौकाच्या घुसखोरीला आळा घालण्यास मत्स्य व्यवसाय विभाग प्रशासनाला अपयश येत आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. गुरुवारी सकाळी तालुक्यातील कुणकेश्वर किनारपट्टी नजीक ७ ते ८ वाव च्या अंतरात पर जिल्ह्यातील सुमारे ५० ते ६० पर्ससीन नौका घुसखोरी करून या नौकांद्वारे मासेमारी करीत असल्याची बाब पारंपारिक मच्छिमार व रापण संघ यांच्या निदर्शनास येतात. त्यांनी मत्स्यपरवाना अधिकारी देवगड यांच्याशी तसेच मत्स्य आयुक्तांची संपर्क साधून तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.
दरम्यान, संपूर्ण जिल्ह्यात एकमेव सागर गस्ती नौका मत्स्यव्यवसाय विभागाकडे असल्यामुळे तसेच नव्याने येणारी गस्ती नौकाही शासनाकडून उपलब्ध झालेली नाही. त्याचबरोबर मालवण येथे या आगामी काळात होणाऱ्या नौसेना दिनाच्या कार्यक्रमात सर्व प्रशासकीय यंत्रणा गुंतलेली आहे. आवश्यक ती कार्यवाही करण्याकरता आवश्यक असलेली सागरीगस्ती नौकाही वेळीच उपलब्ध न होता न झाल्याने पारंपरिक मच्छीमार वर्गात नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान देवगड मत्स्य परवाना अधिकारी यांच्याशी पारंपारिक मच्छिमार व आपण संघाचे प्रतिनिधी यांनी भेट घेऊन त्यांच्याशी ही तक्रार मांडली प्रसंगी मत्स्य परवाना अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात एकमेव कार्यरत असलेल्या गस्ती नौकेला पाचारण करून पोलीस प्रशासन तसेच महसूल प्रशासन , तहसीलदार यांच्याशी चर्चा करून पोलीस प्रशासना समवेत संयुक्त सागरी वस्तीसाठी लेखी पत्र देऊन पोलीस प्रशासनाकडून सागरी गस्तीची मागणी केली असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले. यात सुमारे तीन ते चार तासांचा कालावधी उलटून गेल्यामुळे पारंपरिक मच्छीमार व रापण संघात देखील प्रशासनाच्या उदासीनेते बाबत नाराजी व्यक्त करण्यात येऊन यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या१ डिसेंबर चा आमरण उपोषणाचा कार्यक्रम नौदल दिनाच्या निमित्ताने पुढे ढकलण्याचा निर्णय पारंपारिक मच्छीमार व रापण संघाच्या प्रतिनिधी घेतला होता. परंतु सद्यस्थितीत पर जिल्ह्यातील पर्ससीन नौकांचे किनारपट्टीवर ७ ते ८ वाव अंतरात होणारे आक्रमण व त्यामुळे स्थानिक पारंपरिक मच्छिमार व रापण संघाला उपासमारीची पाळी येत असल्यामुळे १ डिसेंबर २०२३ नंतर कोणत्याही क्षणी मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालय मालवण याचे समोर आमरण उपोषण प्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या शिष्टमंडळाने मत्स्य परवाना अधिकारी देवगड यांना दिला आहे मत्स्य व्यवसाय दरम्यान मत्स्य व्यवसाय परवाना अधिकाऱ्याकडून प्राप्त माहितीनुसार मत्स्यव्यवसाय गस्ती नौकेद्वारे तसेच किनाऱ्यावर अंमलबजावणी अधिकाऱ्याकडून सन २०२२ २३ मध्ये बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या नौक्काकडून रु ८०५७७/- मासळी लिलाव करण्यात आला आहे. अशी माहिती मत्स्य परवाना अधिकारी यांनी घेऊन अभिनिर्णय अधिकारी तथा सहाय्यक मत्स्य व्यवसाय सिंधुदुर्ग मालवण यांचे मार्फत रु २०/- लाख एवढी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
तसेच सन २०२३-२४ मध्ये आज पर्यंत ५ बेकायदेशीर मासेमारी करण्यात नौकाना दंडात्मक कारवाईसाठी म.सा. म.नि. अ.१९८१ अंतर्गत सहाय्यक महस्य व्यवसाय तालुका सिंधुदुर्ग यांच्याकडे प्रती वेदन या कार्यालयामार्फत दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती देण्यात आली. गस्तीदरम्यान निदर्शनात आलेल्या बेकायदेशीर त्या समुद्रात मसामा निअ १९८१ अंतर्गत तरतुदी व कलमानुसार दंडात्मक कारवाई त्याची वेदन दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याचे त्यांनी या सांगून सद्यस्थितीत देवगड यांच्याकडे अधीस्वाक्षरीताकडे वेंगुर्ला कार्यक्षेत्र सुद्ध अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. तसेच बंदरात उभे असलेल्या नौका बाबत तपासणी करून नौका धारकांना नोटीस देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. १ डिसें २०२३ रोजी पुकारलेले उपोषण आपण मागे घ्यावे व कार्यालयास सहकार्य करावे अशी विनंती त्यांनी पारंपरिक मच्छिमार रापण संघ प्रतिनिधी याना केली आहे. यावेळी प्रसाद धुरत, किशोर जोशी,विश्वास भुजबळ, वसंत लालये,मकरंद लाड़, बापू जुवाटकर आदी उपस्थित होते .