पॉलिटेक्निक प्रवेशाकरिता पहिली पसंती फेरी 23 जुलैपासून

भोसले पॉलिटेक्निक येथे मोफत प्रवेश सुविधा केंद्र
Edited by: विनायक गावस
Published on: July 21, 2023 21:55 PM
views 76  views

सावंतवाडी : पॉलिटेक्निक प्रवेशासाठी संस्था व अभ्यासक्रम निवडण्याची पसंती फेरी (कॅप राऊंड )रविवार, दि.23 जुलै रोजी सुरू होत आहे. दहावीनंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिता तंत्रशिक्षण विभागातर्फे प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून विहित मुदतीत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संस्था व अभ्यासक्रम पसंती फेरी 23-26 जुलै या कालावधीत राबवली जाणार आहे.

 यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील पॉलिटेक्निक विभागात महाराष्ट्र शासनाचे मोफत प्रवेश सुविधा केंद्र कार्यरत असून येथील अभ्यासक्रमांचे चॉईस कोड पुढीलप्रमाणे - मेकॅनिकल इंजिनिअरिंग  (347061210), इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (347029310), कॉम्प्युटर इंजिनिअरिंग (347024510) सिव्हिल इंजिनिअरिंग (347019110)

इच्छुक विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये संपर्क साधावा व ऑनलाइन पसंतीक्रमाद्वारे आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन कॉलेजतर्फे करण्यात आले आहे.