
कणकवली : कणकवली शहरातलगत असलेल्या बाल शिवाजी इंग्लिश मीडियम च्या वतीने मुलांमध्ये उद्योजकता हि वृत्ती निर्माण करणे व गृहिणींसाठी त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी
प्रथमच विद्यार्थ्यांसाठी फूड फेस्टिवल व विविध कलागुणांचा कार्यक्रम उद्या ११ मार्च रोजी सायं. ४ ते ५.३० वाजेपर्यंत (खाऊ गल्ली) व त्यानंतर सायं. ५.३० ते पुढे कला महोत्सव. आणि महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
या कार्यक्रमासाठी आदर्श एज्युकेशन सोसायटी व नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगीवे खारेपाटण चे अध्यक्ष मनोज गुळेकर प्रमुख हे देखील उपस्थित राहणार आहेत तसेच तेजस जयराम जांभवडेकर मराठी अभिनेते (नाटक, हिंदी चित्रपट आणि मराठी मालिका), हेदेखील उपस्थित राहणार असल्याने बाल शिवाजी इंग्लिश मीडियम च्या मुलांमध्ये पालकांमध्ये व महिलांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे