...जेव्हा फायरब्रॅण्ड अंधारेंमधली आई जागी होते !

Edited by: विनायक गावस
Published on: November 23, 2022 20:28 PM
views 272  views

सावंतवाडी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे सावंतवाडी शिवसेना शाखेत जंगी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्यासह येथील शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या हस्ते त्यांच पुष्पगुच्छ देत व औषण करत स्वागत करण्यात आल. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. फटाक्यांच्या या आवाजानं सुषमा अंधारे यांची मुलगी घाबरली अन रडू लागली. यावेळी आपल्या मुलीला कुशीत घेत थारवलं. या प्रसंगामुळे फायर ब्रॅण्ड अंधारेंमधील आई पहायला मिळाली.यावेळी उपनेत्या संजना घाडी, जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हा संघटक जानवी सावंत, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, चंद्रकांत कासार, मायकल डिसोजा, बाळा गावडे, आबा सावंत, योगेश नाईक, शब्बीर मणियार, शैलेश गवंडळकर आदी उपस्थित होते.