कणकवलीत बेकरीसह मेडिकल स्टोअरला आग

Edited by: ब्युरो
Published on: November 01, 2024 08:02 AM
views 56  views

सिंधुदुर्ग  : कणकवली शहरातील मुख्य अप्पासाहेब पटवर्धन या मुख्य चौकात असलेल्या आरबी बेकरीसह एक मेडिकल स्टोअर आणि एका खाजगी ऑफिसला आग लागून मोठे नुकसान झाले. शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. 

कणकवली तसेच कुडाळ नगरपंचायत व कुडाळ एमआयडीसी येथे अग्निशमन बुंब आग विझवण्यासाठी  दाखल झाले होते.

 शॉर्टसर्किटने आग लागली असावी असा अंदाज उपस्थित होत आहे. 

आर बी बेकर्स यांचा दुकानातील संपूर्ण फर्निचर बेकरी माल जळून खाक झाला. तर बेकरीच्या मागील राजू गवाणकर यांचे कार्यालय आणि  कार्यालयालगत असलेल्या बर्डे यांच्या मेडिकल स्टोअर मधील साहित्याचे ही मोठे नुकसान झाले. 


घटनास्थळी पोलीस नगरपंचायत, महसूल प्रशासन दाखल झाले होते. नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मालवण नगरपालिकेची अग्निशमन  गाडी ही दाखल झाली होती.  50  लाखापेक्षा जास्त नुकसान झाले आहे.