दोडामार्ग : झरेबांबर येथे आठ एकर क्षेत्रातील काजू बागायतीला आग लागून येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. मात्र ही आग कशामुळे लागली हे मात्र स्पष्ट झाले नाही. या नुकसानीची दोडामार्ग महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की झरेबांबर येथे दुपारच्या सत्रात काजू बागयतीमधून धूर येत असल्याचे काही जणांना निदर्शनास आली. यावेळी दुपारची वेळ असल्याने आग विजविण्यासाठी धावपळ करणाऱ्या शेतकऱ्यांना आग आटोक्यात आली नाही. त्यामुळे सुमारे 8 एकर क्षेत्रात हळू हळू आग पसरल्याने सुमारे 700 हुन अधिक कलमे तसेच बांबू आगीत जळून खाक झाली. यात केशव जयराम गवस, श्रीकृष्ण यशवंत शेटकऱ, दिलीप तुकाराम शेटकर, राजन यशवंत शेटकर, महादेव कृष्णा गवस, सरपंच अनिल शेटकऱ यांच्या मालकीच्या जमिनीतील काजू कलमे जळून खाक झाली. त्यामुळे या शेतकऱ्यांचे लाखो रुपायाचे नुकसान झाले.
केशव गवस यांना अश्रू अनावर
आपल्या काजू बागायतीला आग लागली ही घटना समजाताच केशव गवस यांनी आपल्या बागायतीकडे धाव घेतली. व आग विजविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यांच्या लगतचे शेतकरी सुद्धा आग विझविण्यासाठी मोठे शर्तीचे प्रयत्न केले. मात्र दुपारची वेळ आणि सुसाट्याचा वारा यामुळे आग बघता बघता सर्वत्र पसरली. रक्ताचे पाणी करून उभी केलेली काजू कलमे डोळ्या देखत जळून खाक झाली. त्यामुळे गवस यांच्या डोळ्यात अश्रू आले.