
चिपळूण : पिंपळी येथे भंगाराच्या गोदामाला अचानक आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळ पास आग विजवण्यासाठी अग्निशमन बंब नसल्यामुळे गैरसोय झाली. खेर्डी एम.आय. डी.सी मध्ये अग्निशमन केंद्र असून तिथे अग्निशमन बंब नसल्यामुळे त्याचा उपयोग झाला नाही.
खेर्डी व पिंपळी या दोन गावातील अंतर अतिशय कमी असल्याने जर खेर्डी येथील अग्निशमन केंद्र चालू असते तर होणारी नुकसान टाळता आली असती.यापूर्वीही सदरचे फायर स्टेशन चालू व्हावे म्हणून लोकप्रतिनिधी मार्फत एम.आय. डी.सी कडे संपर्क साधला होता. पिंपळी येथील घटनेबाबत राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष नितिन ठसाळे यांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे याबाबत माहिती दिली व लगेचच आमदार यांनी पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याजवळ संपर्क साधला असता पालकमंत्री यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचे अधिक्षक अभियंता यांना तातडीने खेर्डी येथील अग्निशमन केंद्र चालू करण्याचे आदेश दिले आहे.