
सावंतवाडी : सावंतवाडी येथील राजा शिवाजी चौक मित्र मंडळाला सैनिक नागरी पतसंस्थेने आर्थिक सहकार्य केले. येथील शिवाजी चौक या मंडळाने गेल्या वर्षात समाजोपयोगी कार्य केले. त्यामध्ये शालेय मुलांना साहित्य वाटप, गोरगरीब, गरजूंना केलेली मदत या व इतर समाज उपयोगी कार्य पाहून आर्थिक सहाय्य केले.
यावेळी सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, व्हाईस चेअरमन चंद्रकांत शिरसाठ, बँकेचे सीईओ सुनील राऊळ, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, मंडळाचे अध्यक्ष बंटी माटेकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.