चराठेतील 'त्या' कुटुंबाला मंत्री केसरकरांकडून आर्थिक मदत

Edited by: विनायक गांवस
Published on: August 02, 2024 08:29 AM
views 163  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील चराठे येथील शेतकरी यशवंत गणपत बिर्जे, रा. चराठा (गावठणवाडी) यांचा रहात्या घराची अतिवृष्टीमुळे भित कोसळून बिर्जे व त्यांच्या इयत्ता १० वी मध्ये शिकत असलेला मुलगा गणपत मातीच्या ढिगा-याखाली सापडून जबर जखमी झाले. ग्रामस्थांनी तात्काळ ढिगा-याखालून दोन्ही व्यक्तींना काढून जखमी परिस्थितीत उपचारासाठी उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या  यशवंत बिर्जे यांना तातडीची मदत म्हणुन सावंतवाडी आमदार तथा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी तातडीची आर्थिक मदत केली.

चराठे येथे शिवसेना पक्षाचे  जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुका प्रमुख नारायण राणे, उपतालुका प्रमुख संजय माजगांवकर, माजगांव विभागप्रमुख उमेश गांवकर, कोलगांव विभागप्रमुख महेश ऊर्फ पप्पू सावंत, सरपंच सौ. प्रचिती कुबल, उपविभाप्रमुख राजु कुबल, चराठा शाखाप्रमुख राजन परब, कुणकेरी शाखाप्रमुख नारायण सावंत, बुथप्रमुख प्रशांत बिर्जे, उमेश परब व ग्रामस्थ यानी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देवून बिर्जे कुटुंबाला आर्थिक मदत केली.