विशाल परब यांच्यामार्फत रेडीतील गरजूंना ३० हजारांची आर्थिक मदत !

Edited by: दिपेश परब
Published on: January 18, 2024 10:48 AM
views 266  views

वेंगुर्ला : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा युवा नेते विशाल परब यांनी रेडी येथील विविध गरजू व्यक्तींना ३० हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. 

विशाल परब यांनी रेडी येथील वेदिका विनायक शेटकर यांना  घरदुरुस्तीसाठी १० हजार, मानसी सगुण सातोस्कर यांना घरदुरूस्तीसाठी १५ हजार, आर्या संजय राऊत हिला पदवीधर शिक्षणासाठी ५ हजार अशी एकूण ३० हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. ही मदत रेडी सरपंच रामसिंग राणे यांच्या हस्ते वितरित करण्यात आली. 

   यावेळी उपसरपंच नमिता नागोळकर, ग्रामपंचायत सदस्य आनंद भिसे, श्रीकांत राऊळ, सागर रेडकर, ग्रामस्थ उल्हास नरसुले, अमरेंद्र राणे कर्मचारी सगुण सातोसकर आदी उपस्थित होते. या मदतीसाठी विशाल परब यांचे रेडी ग्रामपंचायत कडून आभार व्यक्त करण्यात आले.