
सावंतवाडी : एक हात मदतीचा या हेतूने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नेहमीच मदतीसाठी धावणारे बाळू माने मित्रमंडळ आहे. या मित्र मंडळाच्यावतीने नेहरून शेख हिच्या आजारावर उपचारासाठी 44 हजार 251रू. ची आर्थिक मदत करण्यात आली. सावंतवाडी तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या शेख कुटुंबातील 10 वर्षाची मुलगी नेहरून शेख ही मे महिन्यापासून आजारपणाला झुंज देत आहे.
याची दखल घेऊन प्रत्येकाने आपल्या परिस्थिती प्रमाणे वर्गणी काढून नेहरून हिचे प्राण वाचवण्यासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे. याच उद्देशाने बाळू माने, त्यांचे सहकारी निलेश मयेकर, सुमित राणे, नितीश सावंत, मंदार शेटये, अल्तामस शेख व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी जमा गेलेली रक्कम शेख कुटुंबियाना बांबुळी हॉस्पिटलमध्ये सुपूर्द करण्यात आली. त्यावेळी शेख कुटुंबीयांनी बाळू माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.